STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

पर्ण

पर्ण

1 min
1.0K

अश्या अनोळखी नजरेने पाहू नको, मी तूझा बाबा आहे.

नवरस तूझे पाहताना, मी स्वतःच विसरू पाहे.


किती गोड आहेस ग तु, वाटतं पहातच रहावं.

त्या छोट्या छोट्या हातांनी कान माझा धरावा, अनं मी पोटभरून रडावं.


तु रागवावं मोठ होऊन, माझ्या पेक्षा लाडाने.

मी भाराऊन न्हाहावे या सुखाने, या एका येडाणे.


तु व्हावी माझी आई, अनं घ्यावी काळजी माझी.

सारं काही ऐकावं कानाने, बोबडी भाषा तुझी.


मिळून सारा पल्लू गाठू, स्वप्न करू सारे पुर्ण.

आयुष्याच्या झाडाला पालवी फुटेल, एक एक विशेष ते पर्ण.


Rate this content
Log in