प्रकृती
प्रकृती
शेती हिरवीगार कडेकडेनी, मधून वाट नागमोडी धावती
गंध लाल तांबडया मातीचा, मन संतुष्ट करुनी जाती
गहू, ज्वारी, बाजरीची भरलेली कणसे; तोऱ्यात ताठ डोलती
गायी, वासरे गोजिरवाणी, हंबरती गोठयात विसावती
गार वारा झोंबतो, मधूनच पानेही सळसळती
पाला-पाचोळयांचा ढिगारा, गालिच्यासम झाडाखाली अंथरती
इथे - तिथे मुंग्यांची वारूळे, आपसूक नजरेस दिसती
चिमणी पाखरे फांद्यांवरती, निसर्गाचा झोपाळा हा झुलती
फुले सुगंधी, विविध रंगी; गर्व स्वतःच्या रूपावरी करती
मधमाश्या येती रस चोखण्या जेव्हा, स्वागत करुनी खुशीत हसती
दिनकर राजाच्या आगमनाने, पूर्ण जग हे समाधानी होती
प्रकृतीची बघून ही श्रीमंती, हृदय प्रसन्न होते माझे अजाणती
