STORYMIRROR

Umakant Kale

Others

4  

Umakant Kale

Others

प्रियसी किंवा सखी म्हणू

प्रियसी किंवा सखी म्हणू

1 min
1.1K

म्हणते ती नेहमीच

नाही मैत्रीच्या पुढे जायचे...

मित्र चांगला तू नेहमीच

आपण असे वागायचे..

पण कसे सांगायचे मी

या वेड्या मनाला..

कसे समजावे या 

धडधड करणाऱ्या काळजाला ...

काय म्हणायचे आता मी

आतुरलेल्या लोचनांना..

जे फक्त प्रेमच अनुभव करते

आणि स्वतः प्रेममय होऊन जाते...

रोज ती रात्र ही विसाव्याचे सोडून

काही क्षणातच जगून घेते..

सहवास हवाहवासा वाटून

झोप ही डोळ्याची उडते..

बोलण्याचा हा हट्टास

बहाणा तो फक्त तुझी साथ मिळावी...

सारे जतन फक्त येथे त्या दोन शब्दाचे

प्रेम आणि फक्त प्रेम द्यायचे 

नाही कधी काय मागायचे, 

नाही हिसाब ठेवायचे

मला फक्त तुझ्यात प्रेममय व्हायचे..

मला फक्त तुझ्यात प्रेममय व्हायचे..


Rate this content
Log in