प्रियकर
प्रियकर
1 min
508
प्रियकर तो माझा
हळूच कानात सांगून जातो
बघ ना गं वसंत ऋतू
ढगात गर्जना होतो
नाद ऐकुणी वर्षाचा
मोर ही नाचत राहतो
थेंब थेंब पावसाचा स्पर्श मला
तुझ्या बील्लोरी स्वप्नात नेतो
येता शहारे अंगावरती
आठवण तुझी छळते
तुझ्या भेटीच्या मोहापाई
जीव माझा जळते
हिरव्या हिरव्या गवतावरती
डोलत राहती पाती
तुझ्या माझ्या सहवासाची
वाढत राहती नाती
दवबिंदूचा थेंब दिसते
टपोरा वाणी मोती
तुला पाहता समोर सखे
धडधडती माझी छाती
उंच उंच त्या पर्वतरांगा
नववधू गत दिसते
हात तुझा माझ्या हातात पाहून
हळूच लाजून हसते
