प्रियभूमी तू भारत देशा
प्रियभूमी तू भारत देशा
अभिमानी देशा, स्वाभिमानी देशा
एक धर्म, एक मंत्र, नवचैतन्य देशा
ध्वज फडकतो ऊंच गगनात, देश प्रेम जागे चराचरात
श्वास तू देशा ध्यास तू देशा, प्रियभूमी तू भारत देशा
बंदीशाहीच्या बेड्या तोडुनी क्रांतिध्वज फडकतो
सीमेवर रक्त वाहुनी सैनिक जननीचे ऋण फेडितो
वीर तू देशा शूर तू देशा, प्रियभूमी तू भारत देशा
लढाऊ प्राणज्योत कर्मभूमी, असा हा केसरी
सत्व पवित्र शुभ्र असा हा पांढरा
कर्तृत्वनिष्ठा गौरवास्पद असा हा हिरवा
रणभूमीवर रंग उधळुनी फडकत राहे सदा तिरंगा
शांती-समृद्धी जीवनमूल्य देई राही अशोकचक्र
ध्वज पताका फडकत राहे ही आमची जीती
तू बहूरंगी तू बहूढंगी, प्रियभूमी तू भारत देशा
शत्रूलाही घाम फुटेल असे रूद्र रूप तुझे
दगडालाही पाझर फुटेल असे हृदयी प्रेम तुझे
दाही दिशा वाजे डंका असे अनोखे गीत तुझे
सार्वभौमत्व देशा, स्वामित्व देशा, अभिमानी देशा, स्वाभिमानी देशा
एक धर्म, एक मंत्र, नवचैतन्य देशा, प्रियभूमी तू भारत देशा
