प्रिय चहा
प्रिय चहा
1 min
165
रोज सकाळी आठवण येते
तुझ्याशिवाय कुठे मला करमते
चहाचा गंध सर्वत्र दरवळते
तेव्हा झोपेतून मला जाग येते
सकाळची सुरुवात होते तुझ्याने
दिवसभर काम करी आनंदाने
घरी येता कुणी सोयरे धायरे
हातात चहाचा कप द्या रे
पावसात ओलेचिंब झाल्यावर
मजा येते गरम चहा पिल्यावर
काम करून आला जरा आळस
चहाच्या घोटाने मिळे बाळस
रात्र जागरण असेल करायचे
सोबतीला असेल केटली चहाचे
संपत नाही हे चहाचे पुराण
चहा मिळेना तेव्हा होई हैराण
