प्रिय आजोबा
प्रिय आजोबा
1 min
431
खूप लाडके आहेत आजोबा माझे
खूप लाड करतात ते नेहमी माझे
माझ्याशिवाय त्यांना करमत नाही
छानछान गोष्टी मला सांगत राही
चष्मा नेहमी त्यांच्या डोळ्यावर
मात्र बारीक नजर असे माझ्यावर
सकाळी उठून ते देवळात जातात
सायंकाळी मला फिरायला नेतात
खाण्याच्या बाबतीत आम्ही दोघे सेम
आईचा आमच्यावर सदा असतो नेम
चॉकलेट खातो आम्ही लपूनछपून
याचसाठी तर आई जाते रागावून
अशा वेळी सांभाळतात मला आजोबा
खूपच गोड आहेत माझे बाबांचे बाबा
