परिश्रम
परिश्रम
1 min
377
श्रमाविणा इथे कधी कुणाला
सांगा आहे मिळाले का काही
जर मिळाले असेल कदाचित
टिकण्याची किती असते ग्वाही
एक वेगळा आनंद असतो मनी
बघा कष्ट दुसऱ्यासाठी करताना
आयुष्यभर प्रामाणिक कष्ट करता
समाधान असते चित्ती मरताना
अविरत जीवनी करता परिश्रम
यश एक दिनी चरणाशी लोळेल
फक्त न थकता कष्ट करत रहा
एक दिनी हवे ते नक्की मिळेल
येवो कितीही बिकट परिस्थिती
कष्ट करण्यास ना लाजवे कधी
होतात मोठे तेच ह्या जगतात
जे यशासाठी कष्ट घेतात आधी
