Tushar Chandrakant Mhatre
Others
अवकाळीचा अवखळ
माझ्या अंगणी उतरला,
नित्याचा नितळ
माझ्या अंगावरी बरसला,
शैशवाचा शितल
माझ्या शरीरी स्पर्शला,
सृजनाचा सृजक
असा येऊनी हर्षला,
वळवाचा वळू
आज भूमीवरी धावला,
परिसाचा पाऊस
माझ्या मनाला भावला.
सलिल श्यामल
संघर्षाच्या ज...
भयाण अंधार
हसरे दु:ख
बिनचेहऱ्याचा ...
दोस्तहो...!!!
झुंड
हृदयाची वैद्य
उद्यापासून जि...
वेळ... थांबत ...