प्रीतीचं झुळझुळ पाणी
प्रीतीचं झुळझुळ पाणी
होताच नजरानजर एकांती
ओठांमध्ये गुणगुणलो गाणी
सखी मर्जी बहाल तुजवरती
वाहते प्रीतीचं झुळझुळ पाणी
मदनाची मजला बाधा झाली
प्रेमरसामध्येच कविता न्हाली
ऐकता कालपावेतो ही अंगाई
अचानक जीवनात तीच आली
पाहिले सहज एकदा तिजला
प्रीत माझ्या मनामध्ये जागली
चोरट्या हळुवारच इशाऱ्यांनी
प्रीत दोघांतील रूजली चांगली
डुंबून गेलो प्रेमसागरातच दोघे
गाठून मिलनाचे ते सुखद क्षण
सखीचे लाडिक हट्ट पुरविण्या
केली तिच्या पाठी मी वणवण
होकार मिळताच सखीचा मला
मनमयूर नाचला जणू रानीवनी
प्रेम पाखरू उडाले उंचच गगनी
आनंद दाटला बहू माझ्या मनी
