STORYMIRROR

Sarika Musale

Others

4  

Sarika Musale

Others

प्रीतीचे गीत गावे

प्रीतीचे गीत गावे

1 min
590

चांदण्या या राती नभी

ता-यांत शोभे शशी रे

हात घे हातात माझा

जवळी घे मजशी रे


रातराणी गंधाळली

धुंद राञ मोहरे रे

नजरेने भाव घेता

प्रीत प्रिया बावरे रे


वाहे तो खट्याळ वारा

सूर प्रेमाचे छेडे रे

आपणही त्याच्यासंगे

प्रीतीचे गीत गावे रे


अंधा-या रातीत पिया

काजवे वाट दावी रे

हरवून मीच जावे 

तुझ्या या नजरेत रे


मनी सदा तूच माझ्या

साथ तुझी लाभली रे

हृदयी वसे तूच माझ्या 

तूच जीवनसाथी रे


Rate this content
Log in