STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

2  

Yogita Takatrao

Others

प्रीत तुझी

प्रीत तुझी

1 min
440


प्रीत तुझी नी माझी 

समांतर अशी

असतोस रे

सोबतीला 

तरीही 

दूर 

तू


काळजाला भिडली

रेशमाची स्वप्ने

एकत्र येणे

तुझे माझे

ह्या जन्मी

होणे

ना


मी आणून प्राणही 

नयनांत माझ्या 

वाट पाहते

तुझी सख्या 

तू आता

तरी

ये


निष्प्राण मन झाले 

वर्षांव प्रेमाचा 

करशील का

आस लागे

जीवाला

माझ्या 

रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन