STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी

1 min
11.7K

मनसोक्त बरसतात

रिमझिम पाऊसधारा

चिंबचिंब भिजली

नटखट वसुंधरा...

  

पारिजातकाचा मस्त

सुगंध दरवळला

वसुंधरेवर फुलांचा

सडा छान शिंपडला....


अवखळ अल्लड वारा

बोलतोय मस्त कानात

मातीचा धुंद सुगंध

पसरला दाही दिशात....

  

हरित शालूचे लेणे

सारी सृष्टी ल्याली

दवबिंदूंच्या थेंबाने

अंग अंग मोहरली....


प्रीत तुझी माझी

पावसा मस्तच जमली

येतो बरसतो मनसोक्त

वसुधाही छान सजली....


Rate this content
Log in