प्रीत सोहळा
प्रीत सोहळा
1 min
34
मनसोक्त बरसतात
रिमझिम पाऊसधारा
चिंबचिंब भिजली
नटखट वसुंधरा...
पारिजातकाचा मस्त
सुगंध दरवळला
वसुंधरावर फुलांचा
सडा छान शिंपडला....
अवखळ अल्लड वारा
बोलतोय मस्त कानात
मातीचा धूंद सुगंध
पसरला दाही दिशात,..
हरीत शालूचे लेणं
सारी सृष्टी ल्याली
दवबिंदूंच्या थेंबाने
अंग अंग मोहरली.....
प्रीत सोहळा हा सृष्टीचा
पावसात मस्तच जमला
आला आला नी मनसोक्त
वसुधावर मस्त बरसला...
