STORYMIRROR

SAMPADA DESHPANDE

Others

3  

SAMPADA DESHPANDE

Others

प्रीत बावरी

प्रीत बावरी

1 min
211

सकाळच्या दवबिंदूंपरी कोमल

प्राशुन घ्यावी ओठानी अलगद

सूर्याच्या तांबूस किरणांपरी

हृदयी जागते प्रीत बावरी ||१||


माध्यान्हीच्या तप्त उन्हपरी

उष्ण झळांना लाजवणारी

सर्वस्व उधळून देणारी

हृदयी जागते प्रीत बावरी ||२||


शांत केशरी संध्येपारी 

रंग प्रेमाचे फुलवणारी

दोन मनांत हुरहुरणारी

हृदयी जागते प्रीत बावरी ||३||


घेऊन येई रात्र साजिरी

मिलनाची ओढ उरी

कवेतील गोड चंद्रापरी

हृदयी जागते प्रीत बावरी ||४||


एकदा तरी मिलन व्हावे

आकाश आणि धरतीचे

वाट पाही ती क्षितिजावरी

हृदयी जागते प्रीत बावरी ||५||


Rate this content
Log in