प्रीत अशी वेगळी...
प्रीत अशी वेगळी...
1 min
38
भुंग्या रे भुंग्या रे
घालू नको पिंगा
नाजुकशी कमलिनी
करू नको दंगा
भुंग्या रे भुंग्या रे
गुंजारव केवढा
गोल गोल रिंगाचा
खेळ का रे एवढा
भुंग्या रे भुंग्या रे
प्रीत तुझी आगळी
जायबंदी करी तुला
नाजुकशी पाकळी
भुंग्या रे भुंग्या रे
लाकुड तू पोखरशी
नाजुकशा पाकळ्यात
कैद कैसा होशी
भुंग्या रे भुंग्या रे
अशी तुझी प्रीती
पहाटे तुला जागविण्या
दंवबिंदू येती
भुंग्या रे भुंग्या रे
प्रीत अशी वेगळी
कुणी ना तुझ्याविना
करून जगा दावली
