STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Others

3  

Ashok Shivram Veer

Others

परी

परी

1 min
219

शिकलेला ही येथे हुकला,

नारी जातीच्या प्रेमाला मुकला.

आस त्यांना वंशाच्या दिव्याची,

हेळसांड चालवली नारी जातीची.

मुलगा-मुलगी ठरवणे नसे तिच्या हाती,

नका फोडू खापर तिच्या माथी.

नका बनू कारण नारीच्या दुःखांचे,

तिच मार्ग दाखविल साऱ्या सुखांचे.

कशाला हवा वंशाला दिवा,

मुलगी तर दोन घरांचा दुवा.

घमेंड सोड पुरुष असल्याची,

वेळ आली खांद्याला खांदा लावण्याची.

जाणून घे व्यथा त्या अबोल नारीच्या,

तयार हो स्वागता या कोमल परीच्या.


Rate this content
Log in