परी
परी
1 min
355
आकाशीची सुंदर परी
अवतरली जणू माझ्या घरी
नाजूक छोट्या पावलाने
लक्ष्म आली माझ्या दारी
परी माझी मोहक ती
मनावर मोहिनी टाकणारी
कितीही दुःखात असो
निखळपणे हसवणारी
आशा उद्याच्या माझ्या
डोळ्यात दिसे तिच्या पाहता
माझ्या मनीचे गूढ हे सारे
कळते तिला न सांगता
दरवळ ममजीवनी पसरवणारी
झालीस तू रातराणी
जीवनाला अर्थ दिला
होऊन नवसंजीवनी
