STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

परी....!

परी....!

1 min
402

परी...!

ती....तीच

चावी हरवलेल्या

कुलपाची परी राणी...

माझ्या मनातली परी ...

पऱ्या काही

इसापनितीच्या

कथेतच असतात असे नाही...

किंवा

फक्त स्वप्नातच दिसतात

असेही नाही...

आतवर कोठेतरी

तिचे वास्तव्य असते

आणि

अचानक सूर जुळतात

लय साधते

योग जुळून येतात..

तिची एका शुभ मुहूर्तावर

नजरा नजर होते

गाठ पडते

हृदय धडधडते

ओळख पटते

पायाखालची जमीन सरकते

आणि

पुन्हा जुनेच नाते

नवीन होऊन

त्या परिस्थितीशी जुळते...

वाटते,

जन्मो जन्मीची गाठभेट

अशी

पुन्हा दैवयोगे होते

आणि जन्माचे सार्थक होते...

एखादी खूण

मनात डोकावते

नजरही ती पटकन हेरते

खात्री पटते

तेंव्हा मात्र आश्चर्य वाटते....

जीव भांड्यात पडल्याचे

समाधान पण लाभते

बरे वाटते

मागच्या जन्माची

चावी हरवलेल्या कुलपाची

जणू ती अवस्था असते

आणि

मन पुन्हा

चावी हरवल्याचा

आनंद साजरा करते

अशी परी

जन्मोजन्मी मिळावी

हीच प्रार्थना मन करते

आणि

एका नव्या

जीवन प्रवाहाची सुरुवात होते...

मन प्रसन्न होते

उल्हसित होते

आनंदात भरून राहते....!


Rate this content
Log in