परी
परी
1 min
320
परी ग परी
दिसतेस तू भारी
आहेस तू गोरी गोरी
नाक तुझे इवलेसे
गाल तुझे टोमॅटो जसे
ओठ फार नाजूक
आहे का ग तुला ठाऊक?
केस कसे कुरळे कुरळे
सर्वांपेक्षा आहेत वेगळे
डोळे फिरवते गरागरा
गोल गोल फिरते भराभरा
स्वप्नात माझ्या येते
चुटकीसरशी हवे ते देते
मग मला जाग येते
परीराणी तो पर्यंत
दुसर्या जगात गेलेली असते...
