परी
परी
1 min
234
सर्वांची ती लाडकी
छोटीसी एक परी
लक्ष्मीने जन्म घेतला
बघा आमच्या घरी
तिचे ते गोड हसणे
प्रत्येकाला भावते
बोबडे तिचे बोल
सर्वांना वेड लावते
तिचे रुप सुंदर
ती निरागस अशी
वाटते प्रत्येकाला
स्वर्गातील परी जशी
सर्वांच्या जीवनी आनंद
तिच्या असण्याने आज
तीच तर आहे आमच्या
सर्व घराचा सोनेरी साज
