STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Others

परी माझी

परी माझी

1 min
157

लेक माझी साजिरी

सुंदरा मधुरा गोजिरी

अप्सरा गोडुली जशी

मृदुलाच माझी परी... १


बोल बोबडे मला

आपसूक खेचतात

तुरुतुरु डौल चाल

नजरेला बांधतात... २


पुष्पांहुनी कोमल गाली

सुहास्य ते उमलते

चंद्रखळीत मनोहारी

जग सारे विरघळते... ३


समृद्ध साऱ्या गुणांनी

चंचल चाणाक्ष दुहिता

'समृद्धी' परी माझी

मम जीवनाची अस्मिता... ४


हा आशीर्वत मातेचा

जावे सजवित तू यशवाटा

काळास करुनी चीत

भयासही कर भयभीता... ५


कुणीतरी पाहिली का

आकाशातील परी

जीवनास सोनगंध देणारी

हीच परी आहे खरी... ६


Rate this content
Log in