STORYMIRROR

Sailee Rane

Others

4  

Sailee Rane

Others

प्रहार

प्रहार

1 min
243

झेललेत प्रहार काळजावरी

यमराजाने घेतले प्राण जेव्हा

सत्यवानाला आणले भूमीवरी

झगडून यमराजाशी तेव्हा


सावित्री ती पतिव्रता होती

जिचे पावित्र्य आले कामी

यमराजाकडून प्राण येती

परतुनी तिच्याच स्वधामी


त्या सावित्री परी घडली

दुसरी सावित्री ही इथे

जिनेही सोसले नाना प्रहार

चांगल्या कामासाठी इथे


होती स्त्री शिक्षणाला 

बंदी ज्या काळात

केला विद्रोह आणि

बदल घडवला समाजात


स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ

रोवली त्या ज्ञानज्योतीने

समाजाच्या विचारांची तेढ

मिटवले त्या सावित्रीने


झेलले दगडगोट्यांचे प्रहार

परी मानली नाही हार

पती सोबत केला प्रचार

स्त्री शिक्षणाचा केला उद्धार


Rate this content
Log in