STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

प्रगती...!

प्रगती...!

1 min
192

प्रगती....!


प्रगती प्रगती विकास विकास

ऐकून ऐकून कान किटले

इतिहासाची पाने चाळूण

मन पुरते खरेच विटले...


कालचे पहायचे 

आजचे जगायचे

उद्याचे ठरवायचे

वाटते हेच जीवन का...?


थोडे डोळे उघडे ठेवून

जाणून बुजून तेच तेच

आपण पुन्हा पुन्हा

तेच तेच करायचे का...?


पण इतिहास पुसला 

आणि नवं तेजाने

म्हंटले नवीन काहीतरी

आम्ही करायचे नाही का...?


हां हां म्हणता

मशाल तेजाची पेटली

अन प्रकाश पडला ज्ञानाचा

इतिहास घडला मग मानवी घामाचा...


पाऊल पुढे पडत गेले

चंद्रा नन्तर मंगळावर पडले

ज्ञानाचे खरे दर्शन होता

उज्वल उन्नत्त पहा जीवन घडले...


आता अंधःकार नाही जगती

सुजलाम सुफलाम होईल धरती

यशाचे गाणं राहील कवनी

आंनदाच आंनद भरता जीवनी...!


Rate this content
Log in