Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Yogita Takatrao

Others


4.6  

Yogita Takatrao

Others


परग्रह

परग्रह

1 min 575 1 min 575


एकदा अंतराळात 

हरवला अंतराळवीर

ऊमगले जेव्हा त्यास

तो परग्रहावरती खास


अवाक झाला तो

बघून तिथले सौंदर्य

निसर्गाच्या कुशित 

वसलेला सुंदर ग्रह


परग्रहमानवाने पुसले 

कोण,कुठला तु ?

आमचा सुंदर ग्रह

नष्ट करायला आला तु ?


बघ आमचा ग्रह 

सर्वार्थानेच परिपूर्ण 

नाही प्रगतशील तरी 

ज्ञात समतोल राखणं


तुझा ग्रह तर म्हणे 

गेला कामा मधून ?

सगळंच अलबेल 

अन् चक्र बिघडेल


जागतिक तापमानवाढ

राहिली नावाची हिरवळ

प्रदुषित झालं वातावरण 

आणि चहूकडे दुष्काळ

 

आल्या पावली परत जा

म्हणु लागली सगळी 

फिरकू नकोस पुन्हा 

केली कान उघाडणी


बायका पोरं माणसं 

झाड लाव सांगताना

दाखवती शस्त्र धाक

चुका माणसांच्या बोलताना 


ईकडे तिकडे नको शोधू 

राहण्यास ग्रह दुसरा

अजूनही नष्ट नाहीये

तुमची सजीव धरा


तुझी पृथ्वी होईल 

हिरवीगार सृष्टी 

मुबलक पाणी 

आणि जीवनाची हमी


Rate this content
Log in