प्रेयसी
प्रेयसी
1 min
238
प्रामाणिक मी राधा तुझी
तुला गोपिका हव्या होत्या
आस तुझी मनी ठेवून
हृदयामधल्या घाव सोशिल्या होत्या
तू दिलेल्या जखमावारती
फक्त तुझ्या आठवणीचा
मी लेप लावत होती
मला हवे असे वाटणाऱ्या
प्रत्येक क्षणाला तु बेधुंद
लाटावणी काढून फेकला होता
एकटे वाटे मनाला जरी
तुझा सहवास मिळाला नाही
निसर्गाच्या सानिध्यात तुझ्या
साथीचा विसावा मिळाला नाही
बिलगले तुला अश्रुंच्या धारा गळाल्या
परी तुझा आधार मिळाला नाही
तुझी राधा बनू पाहिले मी
तू तर मला मीरेचाही स्थान दिला नाही
