प्रेरणास्थान, आधारस्तंभ
प्रेरणास्थान, आधारस्तंभ
1 min
471
थकलो आहोत का बाबा?
कधी स्वत:हून विचारावं
गप्पा माराव्या थोडया
बाजूला बसून पहावं
मी कशानं शकलोय
तो असं म्हणून हसेल
कोपऱ्यात जाऊन हळूच
मग नकळत डोळे पुसेल
टेन्शन असते त्यांना
तो शांत बसूून राहतो
बोलून दाखवत नाही
एकटक मॅॅच पाहत राहतात
हळवा माझा बाबा
खुप काळजी करतो
बारा बारा तास ड्युट्या करतो
आमच्या साठी झुरतो.
असे हे माझे बाबा
जगात सर्वापेक्षा भारी आहेत.
