प्रेमरंगी रंगले
प्रेमरंगी रंगले
1 min
214
धुळवड भावनांची,
प्रेमरंगी रंगले,
वसंताच्या आगमनाने,
तनमन दंगले!
आनंदाच्या पिचकारीने,
काया चिंब भिजली,
सृष्टीची मोहकता तेव्हा,
ओलाव्यात थिजली!
गुलाबाचा गुलाल कसा
या गालांना भिडला,
थोडा, चिमूटभर, तेव्हा
खळीमध्ये दडला!
रंग सृष्टीचे आगळेच,
मनामध्ये वरले,
आयुष्याच्या खेळामधले,
घाव सारे भरले!
