प्रेमांमृत
प्रेमांमृत
1 min
161
भुकेनं कळवळल्या बालका मातेचं प्रेमांमृत.
भरकटलेल्या तरूणाईला ज्ञानाचं बोधांमृत.
वेदनेनं रंजल्या जीवाला संजिवनी श्वासांमृत.
दुःखानं होरपळल्या हृदया मैत्रीचं स्पर्शांमृत.
विविध रंगी पाझरणा-या प्रेमाचं इंद्रधनुष्य,
प्रकाशित करतं मानवाचं रटाळ-नश्वर आयुष्य.
