प्रेमांगण
प्रेमांगण
1 min
196
प्रीतीचा दीप परसात लावियेला
मायेन तो अंगणी उजळवला...
प्रकाशमय झाला सारा संसार
प्रेमात नाहीच मुळीच हं हार...
मायेचा वृक्ष लावला परसदारी
फळे चाखली आपल्याच घरी...
प्रेमान फुलवले ही वृक्षवेली
मिळाली मायाममतेची सावली...
प्रेम फुललेय छान नभांगणात
जमूया सारेजण या प्रेमांगणात...
प्रेमांगण फुलू दे जन माणसात
व्देश नको देवा मानवामानवात...
घराचा प्रेमाचा दीप तेवत राहू दे
प्रेमांगणात माणुसकी अशीच राहू दे...
