प्रेमाला कुठली भाषा!
प्रेमाला कुठली भाषा!
प्रेम!!
प्रेमाची कुठे भाषा असते
ती तर तरल थरथरनारी हलचाल
शांत स्वछ डोहात हळूवार दगड भिरकवावा
तशी डोळ्यांच्या इशा-यावर
मनाच्या कोंदणात वादळं निर्मान करणारी
प्रेम!!
प्रेमाची कूठली भाषा
ती तर कृतीतून व्यकत होणारी परीभाषा काळजीन,
धडधडणारी धडपडणारी जीवाच रान करणारी
वेड्या आईची हळवी आशा
प्रेम!!
प्रेमाची कुठली भाषा
ते तर अबोल कधीच व्यकत न होणारे,
पाठीत धपाटे घालणारे
पंरतु पाठीशी सदैव असणारे
आपल्या पुरते आभाळ ऊन वारा पाऊसातले
आणि आयुष्यातल्या गणितातले
झिरो लेकरांचे हिरो बाबा
कृतीतून दाखवत रहातात प्रेमाची आभा
प्रेम!!!
प्रेमाला कुठलीही भाषा कळते
कारण भावाणांच्या हिंदोळयावर
प्रेमाची वेल फुलते
