STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

प्रेमाची भाषा

प्रेमाची भाषा

1 min
475

कधीतरी प्रेमाची

भाषा समजून घे

वेड्या मनाची वेडी

अभिलाषा समजून घे ||0||


साधी सोपी असते ग

मांडणी ही प्रेमाची

मनातील भावनांची

सांधणी ही प्रेमाची

कधीतरी मनाची

आशा समजून घे

वेड्या मनाची वेडी

अभिलाषा समजून घे ||1||


कधी कधी प्रेमात

शब्द कमी पडतात

कधी कधी प्रेमात

शब्दार्थ अडतात

शब्दाविण प्रेमाची

दिशा समजून घे

वेड्या मनाची वेडी

अभिलाषा समजून घे ||2||


शब्दात मांडलं नाही तरी

डोळे वाचता येतात

मनातील शब्दांचा

वेध प्रेमी घेतात

डोळ्यातील भावनांचा

नकाशा समजून घे

वेड्या मनाची वेडी

अभिलाषा समजून घे ||3||


पापण्यांचं झुकणं उठणं

बरंच काही सांगतं

तान्हया बाळासारखं

मन डोळ्यामध्ये रांगतं

नयनांतून हृदयाची

दशा समजून घे

वेड्या मनाची वेडी

अभिलाषा समजून घे ||4||


Rate this content
Log in