प्रेमाचे प्रकार.
प्रेमाचे प्रकार.
प्रेम नजर फुटे, हृदयी कमळ उमटे,
नेत्री पाणी दिसे, बोल अबोल असे,
प्रेमखुण पटे, विसरे जन सारे,
प्रेम झाले कसे, सांगती का सखे ?
प्रकार प्रेमाचे, ओळखावे कसे,?
ते प्रेम, प्रियेसी, प्रियकराचे असे...
वत्स धेनुसी झटे, अमृत पान्हा फुटे,
हात पोळून घेते, बोटी चटके देणे,
बाळास खाऊ घालते, आनंदी चेहरा असे,
निद्रा बाळासी,देई,गं,सखे प्रेम माईचे.
घाम गळे,छाती पुढे, ढाल जसी,
वाहतो पर्वत जसा,
सर्कस तंबू मध्ये ,खांब जसा
प्रेम करतो कसा, अमृवृक्ष कसा,
फळे गोड गोमटी आंबे रसाळ देई
ते प्रेम बापाचे जाणावे सखे.
बंधूप्रेम कसे डोई पादात्रणे घेई,
राज्य आयोद्धेचे करी भरत जसा,
भगिणी प्रेम कसे, अंगिचा पितांबर फाटे,
कृष्णबंधूसाठी द्रोपदीने केले तसे,
भगिणी प्रेम कसे, बघ गं सखे.
प्रेम मित्रांचे, केले सिंहासन मोकळे,
सिंहासनी बसविले,राजा दिसतो कसा,
सुदामा मित्र माझा,प्रेम नित्य राही,
तुझे,माझे,हे प्रेमाचे प्रकार सखे बाई.
