प्रेमाचे अनुभव
प्रेमाचे अनुभव
प्रेमात काही सांगायचं नसतं
प्रेमात काही मागायच नसतं
प्रेम हे फक्त प्रेम असतं
ते जीवनात अनुभवायचं असतं.
प्रेमाच्या नात्याला काही नावं नसतं
हे समजायला कुणी तयार नसतं
हळव्या मनाच्या वेदना सुध्दा
कोणाला काही सांगायचं नसतं.
प्रेमात एक सांत्वन असतं
फुंकर घालणारं एक मनही असतं
प्रेमात भाषा आणि वयही नसतं
आधार देणारं एक स्पर्श असतं.
प्रत्येकाच्या जीवनात प्रेम असतं
कधी त्याला हे माहीतही नसतं
खडतर मार्गावर कुणाची साथ असतं
नकळत त्याला प्रेमाची जाणीव असतं.
अश्या नात्याला काही नाव नसतं
हे समजायला कुणी तयार नसतं
प्रेम हे फक्त प्रेम असतं
ते जीवनात अनुभवायचं असतं.
