STORYMIRROR

पद्मवैखरी ठाकरे

Others

4  

पद्मवैखरी ठाकरे

Others

प्रेमाचा फास

प्रेमाचा फास

1 min
400

अबोला तुझाच हा 

छळतो रात्र न दिन परी

आठवणी साचल्या किती

शब्दि तुझिया अन माझ्या उरी 


शब्दि तुझिया अन माझ्या उरी 

दिसतोस फक्त तू स्वप्नांकीत 

विसरताही विसरून सख्यारे 

उरले हे काही क्षण संचित 


उरले हे काही क्षण संचित 

भोगावे ते भोग आयुष्याचे 

न चुकले ते तुलाही तेव्हा 

अन माझ्याही रिक्त प्रेमाचे 


अन माझ्याही रिक्त प्रेमाचे 

किती कोरडी ही परभाषा 

नको चिंतीत होवून तू आता 

सोडली मीही तुझी आशा 


सोडली मीही तुझी आशा 

तोडला हा फसवा प्रेम फास

सोडूनही मग ही घालमेल 

सोडली तुझ्या येण्याची आस


Rate this content
Log in