प्रेमाचा गुलकंद
प्रेमाचा गुलकंद
1 min
171
सजनाने सारस बागेतून
गुलाब फुले आणली तोडून.....
अर्पण केली देखण्या सजणीला
सुवास अमाप गुलाब फुलाला.....
प्रेम अतोनात बाई सजनाचे
कौतुक सतत त्याच्या सजणीचे....
गुलाब पुष्प आहे द्योतक प्रेमाचे
प्रेमदेवता प्रसन्न क्षण मिलनाचे....
देखणा नजराणा मनी फुलला
मिलनाचा पलंग सौख्यानं सजला.....
मौनानं जागा घेतली प्रीतीची
बरसात झाली दोघात आनंदाची....
प्रेमाचा रंग बाई अती खुलला
प्रेमाचा गुलकंद दोघांनी चाखला....
