STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

प्रेमाचा आठवडा...

प्रेमाचा आठवडा...

1 min
291

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना....

आठवडाभर सूरु असतो वेगवेगळ्या दिवसांनी भरलेला....

खरंच प्रेम एका महिन्यासाठी असतं....

आठ दिवसांसाठी ते प्रेम का दिसतं....


सुरुवात होते त्या दिवसाची रोज डे पासून....

कधी तरी आईला पण त्या रोज जिने एका कळीला फुलासारखं वाढवलंय....


प्रपोज करा दररोज आपल्या प्रिय व्यक्तीला जन्म भरासाठी,

तरच वाढेल प्रेम मनात कुठेतरी....


बाबांनी लहान असताना चॉकलेट खूप दिली असतील

केव्हातरी बाबांना चॉकलेट द्या त्यांच्या आवडीची....


एखाद्या गरीब मुलाला खेळण्यासाठी टेडी बेअर द्या....

खरा आनंद त्याच्या डोळ्यात सापडतो का नाही पाहा.....


घेऊन टाका एक वचन आपल्या जीवनसाथीबरोबर....

कधीही दूर न होण्याचे प्रत्येक क्षणात एकमेकांचे रक्षण करायचे....


एक जादू की झप्पी आजी आजोबा पण मारावी....

तेवढच त्यांना आपुलकीची माया लाभावी....


प्रत्येक दिवस जर प्रेमासाठी जगला तर कुठल्याच नात्यात नाही येणार दरी....

ब्रेकअप, डिवोर्स, जनरेशन गॅपसारखी नाव आपलं अस्तित्व पुसून जातील....


Rate this content
Log in