प्रेम
प्रेम
1 min
142
प्रेम यावे फुलूनी
जेव्हा होई मिलन
मनामनाची होता
हृदयात रुजवण
नको घालवू निसटून
उघड हृदयाची कुपी
तुझ्या माझ्या प्रेमाची
आहे ही रीतच सोपी
मी तुझा सखा मदन
तू माझीच सखी रती
होऊन अमरप्रेम कथा
धुंद होऊ दे सारी मती
करूया प्रेम हे निखळ
नको शारीरिक वासना
बहरत जावी प्रेम लता
नकोत मनाच्या वेदना
साथ देऊया जन्मांतरी
वाटू एकमेकांना व्यथा
निराळ्याच या प्रेमाची
होऊ दे ना अमर कथा
