Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akash Mahalpure

Others

3  

Akash Mahalpure

Others

प्रेम

प्रेम

1 min
290


प्रेम हा शब्द जेव्हा माहित झाला

तु समजुन त्याचा विचार केला

नव्हता अर्थही माहित प्रेमाचा 

दिसली तु की तो उलगडायचा


दिवसही काय होते ते प्रेमाचे ?

तु-मला, मी-तुला बघुन हसण्याचे

कळत नव्हतं हे काय असतं

वाटे प्रेम वेगळ काही नसतं


हळूहळू कळला अर्थ प्रेमाचा

वाढला विश्वास आणखी मनाचा

समजवायचाय तोही अर्थ तुला

प्रेमानेच एकदा भेटुन मला


दाटे मनी शंकेचे आभाळ दाट

शोधली नाहीस ना तु तुझी वाट 

नको जाऊस तु अशी थांब थोडी 

प्रेम सागरी सोडू आपली होडी


Rate this content
Log in