STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

प्रेम

प्रेम

1 min
289

प्रेम म्हणजे सर्वांची नजर चुकवून

टाकलेला कटाक्ष मन टाकतो भुलवून....


प्रेम म्हणजे नजरेची अंतर भाषा

ह्रदय कुपीतील भावनांची परिभाषा..,,


प्रेम म्हणजे आहे जागृत संवेदना

मनातील मायेची उत्कट भावना...


प्रेम म्हणजे आकर्षण एकमेकांचे

हळूवार जपणूक अंतरीच्या मनाचे...


प्रेम म्हणजे अवखळ अल्लड वाट

नटण्या मुरडण्याचा वेगळाच थाट...


प्रेम म्हणजे ह्रदयातील हळूवार शब्द

असतात ते नेहमीच हो निःशब्द....


प्रेम म्हणजे सुसंवाद एकमेकांशी

नाळ जोडलेली आपल्याच कुटुंबाशी


प्रेम म्हणजे काळजी, ओढ ,माया 

एकमेकांच्या सानिध्यात मिळते प्रेम छाया...


Rate this content
Log in