STORYMIRROR

Manoj Joshi

Others

3  

Manoj Joshi

Others

प्रेम

प्रेम

1 min
171

माझ्या अंधाराला तू उजेडात नेताना

भाजलेले हात तूझे पाहीले लपवताना


तू श्रमलेले सारे मी पावसाळे पाहीलेले

दू:ख तूझे पाहीले पावसात लपवताना


शेवटची भाकर ताटात मला वाढलेली

दिसे समई प्रकाशी खळगी लपवताना


पायी माझ्या काटा ह्रदयी तूझ्या दूखे

न दिसे तू भेगांतील वणवा लपवताना


नाळ कापली माझी तें माय झालीस तू

डोंगर डोई झाकलेले तू उरी लपवताना


शेकोटीची ऊब तू तळहातावर झेललेली

हातांवरचे निखारे मळहातात लपवताना


किनार ना सुखाची राहीली ऊशास आता

दिला सुर्य मला तू तूझा चंद्र लपवताना 


Rate this content
Log in