*प्रेम*
*प्रेम*
1 min
11.3K
प्रेम म्हणजे सर्वांची नजर चुकवून
टाकलेला कटाक्ष मन टाकतो भुलवून....
प्रेम म्हणजे नजरेची भाषा
अंतरीच्या भावनांची परिभाषा..,,
प्रेम म्हणजे जागृत संवेदना
मनातील मायेची उत्कट भावना...
प्रेम म्हणजे आकर्षण एकमेकांचे
हळूवार जपणूक अंतरीच्या मनाचे...
प्रेम म्हणजे अवखळ अल्लड वाट
नटण्या मुरडण्याचा वेगळाच थाट...
प्रेम म्हणजे ह्रदयातील हळूवार शब्द
असतात ते नेहमीच हो निःशब्द...
प्रेम म्हणजे वचन एकमेकांना दिलेले
दिलेले शब्द नेहमीच पाळत आलेले....
