प्रेम
प्रेम
1 min
189
प्रेम करावे निसर्गावर
दीनदुबळ्या पशुपक्ष्यांवर,
प्रेम करावे सृष्टीतल्या
प्रत्येक चराचरावर.
आयुष्य होते सुंदर प्रेमाने
रंगबिरंगी प्रेम अनुभवाने,
विश्वातल्या प्रत्येक कणाकणात
प्रेम वाढते प्रत्येकास वाटल्याने.
प्रेम मिळते प्रेम दिल्याने
मायेच्या हळव्या सहवासाने,
प्रेमात नसे लहान-मोठा
समान वागणूक मिळे प्रेमाने.
