प्रेम
प्रेम
1 min
346
प्रेम म्हणजे काय असते,
मनात उठलेले उधाण असते
तिला एक नजर पाहता यावे म्हणून धडपड असते
मात्र समोर येताक्षणीच जी काळजाचा ठोका चुकवते
मनातला एक कोपरा ती कायम व्यापून टाकते
उठता बसता फक्त तिचीच ओढ सतावते
सगळ जगच अचानक सुंदर भासू लागत
तीच माझ सर्वस्व अस मन ठरवून टाकत
आपल्या भावना तिला समजाव्या अस खुप वाटत असत
रागवून दूर तर नाही ना जाणार म्हणून शांत बसाव लागत
तेवढयात भलताच कोणीतरी मारतो बाजी
सगळ संपल अस मानायला मन होत नाही राजी
आजही मनातला तो कोपरा मला रिकामाच वाटतोय
तिचा आलेला साधा मैसेज पण काळजाचा ठोका चुकवतोय
