प्रेम
प्रेम
पालथी घातली दुनिया
कुणी एखाद्या वेड्यासारखी
माथा टेकवून आलो मग असो
ती कन्याकुमारी की मग असो व्दारका
प्रेम म्हणजे
अमृत कि विषाचा प्याला
पिल्यावर कळतो तो प्रत्येकाला
प्रेम म्हणजे
तरूणांसाठी एकदम झक्कास
कुणासाठी निषिद्ध एकदम बकवास
प्रेम म्हणजे
चंद्राचे सागरातील प्रतिबिंब
तर कधी होतो कुणी
बिना पावसात ओलेचिंब
प्रेम म्हणजे
राधेने कृष्णाची केलेली भक्ती
दिसतो जेव्हा दररोज चोहिकडे
आपलाच प्रिय व्यक्ती
प्रेम म्हणजे
कधी सत्य तर कधी नुकताच आभास
कधी निरर्थकता तर कधी तो
स्वप्नपूर्तीचा घेतलेला ध्यास
