प्रेम
प्रेम
जगजाहीर आहे प्रेम आईचे
मायेची पखरणही नेहमी
सारे लक्ष तिचे सदा मुलांवर
तिचे प्रेम कधीच होत नाही कमी १
बाबा प्रेम करतातच मुलांवर
पण दिसत नाही ते कुणाला
मात्र मुलीचे लग्न झाल्यावर
रुमाल लावतात डोळ्याला २
रेशमी बंधाचे प्रेम भावाबहिणीचे
अत्यानंदाने ते कायम जपत असतात
मौजमजेसाठी सणासुदीला भेटण्याचे
जिवाभावाने आपापसात ठरवतात ३
जवानांचे जाज्वल्य देशप्रेम पाहून
अभिमानाने ऊर भरून येतो
देशासाठी तो सीमेवर सज्ज राहून
सर्वांचेच धीरोदात्तपणे रक्षण करतो ४
दोन प्रेमी युगुलांचे प्रेम तर
सारे म्हणतात आंधळं असतं
एकमेकांना समजून घ्यायचे तर
जीवनात चांगलं डोळस व्हावं लागतं ५
प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे
जगाची रीतच आहे खरी
असेच नाते जपत रहावे
मग जीवन होऊन जाईल भारी ६
