प्रेम
प्रेम
1 min
417
तुझ्यावाचून क्षण हा क्षण नाही माझ्यासाठी
वाटतो वर्षासारखा
तुझ्या वाचून रात्र ही रात्र नाही माझ्यासाठी
ती तर एक काळरात्र आहे
तुझ्यावाचून शरीर हे शरीर नाही माझे
दिलू हे तर एक प्रेत आहे
तुझ्या प्रेमासाठी मन झाले माझे बावरे
विचलित तन कावरे बावरे
तुझ्या मिठीत येण्यासाठी मनच न आवरे
तुझ्यात एक होण्यासाठी
तुझ्यासाठी तर दिलू माझे हे रसरसलेले
तारुण्य वाहे नदीवानी
वाहत येत आहे सागराच्या मिलनासाठी
त्यामध्ये लीन होण्यासाठी
