प्रेम
प्रेम
1 min
120
क्षण क्षण जगावा आपण
जीवन हे क्षणभंगुर गड्या
घेशील ना आता तू वेड्या
उपभोग सुंदर जीवनाचा
जपा नित्य प्रेम जिव्हाळा
नको देऊ कधीच उन्हाळा
नित्य वसु दे इथे प्रेमधारा
जसा पाझरतो पावसाळा
गर्व अहंकार नकोच धरू
राहू सर्वजण एकजुटीने
भांडणतंटा नि द्वेष मत्सर
नका राहू हो फाटाफुटीने
ठेवू परस्परांमध्ये माणुसकी
जोडूनी प्रेमाची अशी नाती
बांधू घट्ट ती रेशीम धाग्याने
वाढवू आपसांतली ही प्रीती
आजचा दिवस हाच आपला
जगून घ्यावाच नित्य सुखात
हरी नाम स्मरण करून सदा
घेऊ अन्नाचा हा घास मुखात
