प्रेम
प्रेम
1 min
375
प्रेम म्हणजे काय असतं ?
कधी हसणं कधी रूसणं असतं..
कधी आठवणीत झुरणं असतं..
उगाचच मागं मागं फिरणं असतं.
कधी हृदयातून हाक देणं असतं..
कधी विरहात व्याकूळ होणं असतं.
प्रेम काय सांगून होतं का ?
नकळत येतं जुळून..
मनाच्या भावना मनाला ..
आपसूकच येतात कळून.
प्रेम म्हणजे असतो श्वास..
एकमेकांना दिलेला अतूट विश्वास.
प्रेमामध्ये कशाला हवाय..
फक्त मिळवण्यासाठी अट्टाहास.
प्रेम म्हणजे फक्त घेणं नव्हे..
एकमेकासाठी जगणं असतं.
प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं
प्रेम म्हणजे त्याग करणंही असतं
