STORYMIRROR

Harshada Wakchaure

Others

4  

Harshada Wakchaure

Others

प्रेम

प्रेम

1 min
331

पावसाची सर आता,

नुकतीच बरसली

आणि प्रेमाची हिरवळ

पुन्हा एकदा मनात खुलली

नटखट कृष्ण तु माझा,

मी तुझी बावरी राधा

काय रे कृष्णा वाजवतोस..

बासरी माझ्या नावा !

विचारते तर नुसतं म्हणतो, 

राधा राधा..

एवढा काय तुला सुरांचा वेडावा

आठवणींत राहू दे कन्हैया

माझ्यामुळेच आहे सुरांच्या

मैफलित मेळावा

नटखट कृष्ण तु माझा,

मी तुझी बावरी राधा

पुकारतो बासरीतून मला,

तिचा आवाज ऐकताच!!

जीव माझा होतो वेडा-खुळा

विचारलं तर सांगतो,

प्रेम फायद्यासाठी नाही करायचं! 

नेहमी विवाहाबद्दल हेच सांगतो,

विवाहासाठी दोन जीव लागतात

आपण तर एक आहोत,

मग!कसला गं आपल्यात दुरावा

नटखट कृष्ण तु माझा,

मी तुझी बावरी राधा


Rate this content
Log in